09 July 2012

ब्लॉगर.com वर ब्लॉग कसा तयार करावा?

लेखक:- Nitin Darekar at 4:05 PM
१) आपल्या वेब ब्राऊजर सुरू करून www.blogger.com वर जा.
२) जर आपले गुगल अकांऊट नसेल (म्हणजे आपण gmail  वैगरे गुगलच्या सुविधा वापरत नसाल तर)  सर्वप्रथम ते तयार करा.
       अ) त्यासाठी खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे उजव्या कोपर्‍यातील SIGN UP बटणावर क्लिक करा.

       ब) खाली दर्शवल्याप्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित भरा.
३) जर तुमचे गुगल अकाऊंट असेल तर तुम्ही ते वापरून साइन इन करू शकतात. नवीन अकाऊंट तयार    करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी तुमचे युजर नेम आणि पासवर्ड टाकून साईन इन करा.



४) त्यानंतर खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे "Back to Blogger" या बटणावर क्लिक करा.
 


५) आता खाली दाखविल्याप्रमाणे तुम्हाला जर Google+ प्रोफाइल तयार करायची असल्यास "Create a Google+ profile" बटणावर क्लिक करा, अन्यथा केवळ "Create a Limited Blogger profile"  या बटणावर   क्लिक करून तुमचे Display name टाका आणि "Continue to Blogger" या बटणावर क्लिक करा.


६) आता नवीन पृष्ठ उघडेल. येथे उजव्या कोपर्‍यात "New Blog" या बटणावर क्लिक करा.




७)  त्यानंतर एक पॉप अप विंडो उघडेल. त्यात तुमच्या ब्लॉगचे नाव ( खालील आकृतीत 'Example Blog' ), वेब अ‍ॅड्रेस (खालील आकृतीत 'mr-exblog.blogspot.com' ) आणि तुम्हाला आवडणारी टेंम्प्लेट निवडा. टेंम्प्लेट म्हणजे तुमच्या ब्लॉगचा दर्शनीय अवतार. सविस्तर पुढे बघूच. आता 'Create Blog!' या बटणावर क्लिक करा. येथे भरलेली माहिती व निवडलेली टेंम्प्लेट तुम्ही नंतर केव्हाही बदलू शकता


.
८) आता तुमचा नवीन ब्लॉग तयार झालेला आहे. ब्लॉगवर लिहण्यासाठी खाली दाखविल्याप्रमाणे 'Start Posting' वर क्लिक करा.

९) आता तुम्ही ब्लॉगवर लिहू शकतात. त्यासाठी पोस्टला शीर्षक द्या आणि मजकूर लिहा. जर लिहणे पूर्ण झाले असेल तर Publish बटणावर क्लिक करा म्हणजे ती पोस्ट तुमच्या ब्लॉगवर दिसेल.  नाहीतर  पोस्ट अर्धवट असल्यास save बटणावर क्लिक करा म्हणजे ती पोस्ट तुमच्या ब्लॉगवर न दिसता जतन केली जाईल. नवीन पोस्टबद्दल सविस्तर नंतर बघूच.


१०) तुमच्या ब्लॉग संबधीत माहिती (पोस्ट्स, स्टॅट्स, सेटिंग्स, इ.) पाहण्यासाठी ब्लॉगच्या नावावर क्लिक करा. त्यानंतर खाली पृष्ठ उघडेल.

 ११) आता तुमचा ब्लॉग पाहण्यासाठी "View Blog" बटणावर क्लिक करा.
बस काम फत्ते!

एका गुगल अकाऊंटवर तुम्ही जास्तीत जास्त १०० ब्लॉग्ज बनवू शकता. प्रत्येक ब्लॉगसाठी वेगळे अकाऊंट तयार करण्याची आवश्यकता नाही.

20 comments:

Unknown said...

नितीन भाऊ आपण खुपच छान माहिती दिली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपले मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार ! मी सुध्दा काहि दिवसांपुर्वीच माझा ब्लॉग बनवला आणि माझ्या एका फेसबुक फ्रेंडलाहि ब्लॉग ऊघडण्याची सुचना केली . त्यासाठी त्याला माझे मार्गदर्शन हवे होते मी हि माझ्या परिने त्याला मार्गदर्शन केले. पण मी हि ह्या क्षेत्रात नविन असल्याने मार्गदर्शनावर आपोआप मर्यादा आल्या. म्हणून मी ब्लॉग कसा सुरू करावा . असे गुगल सर्च केले व त्याची लिंक त्यावेळी बरेच सर्च रिझल्ट आले. पण त्यातील सर्वात पहिला रिझल्ट आपल्या नावाचा होता. आणि खरोखरच खुप सुंदररित्या आपण हे समजवून सांगितले आहे. माझ्या मित्रास ह्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद भाऊ.
हि माझ्या फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/1WoWTPc

सुप्रभात !


निलेश गुंजाळ said...

kharach chan mahiti

whats app said...

सर आपण माहिती खरच खूप छान दिली। मी पण एक ब्लॉग बनवला पण त्याची traffic वाढवण्यासाठी काही ideas द्या


whats app said...

सर आपण माहिती खरच खूप छान दिली। मी पण एक ब्लॉग बनवला पण त्याची traffic वाढवण्यासाठी काही ideas द्या


Unknown said...

khup chan sir

Unknown said...

thanks

Unknown said...

thanks

Unknown said...

khup chan sir

जनार्दन वारघडे said...

छान माहिती! आभार!

Madhu Patil said...

छान माहिती मिळाली... धन्यवाद.

kiran nakadi said...

kahich shanka nahi...... khupach chhan ......
thanku

Unknown said...

Sunder lekh Khup Aavadla. Dhanyawad!

Unknown said...

ब्लाॅग बनविण्याची सविस्तर माहिती दिली आहात . आपले मनापासून अभिनंदन !

Journalist gopal h vyas.blogger.com said...

भाऊ खुप छान पन ब्लॉग च्या माध्यमातून प्रसिद्घि तसेच इनकम चे मार्गदर्शन हवे

सागर म. डवरी said...

thnx..u give very helpful information.

Scholar Education said...

खूप छान माहिती आहे सर.

माय मराठी said...

छान माहिती

Lakhan wankhade said...

माझ्या ब्लॉगवर सुद्धा मी हीच माहिती दिली आहे पण तुम्ही खूप छान लेख लिहिला आहे

लक्षवेधी said...

छान माहिती दिलीत शुभेच्छा 💐💐💐

Anonymous said...

Nice information more details
Visit www.onlineinfopedia.com

Post a Comment

 

Copyright © Nitin Darekar टेक्नो मराठी |कॉपीराईट © नितीन दरेकर>